Thur, June 1, 2023

रजपूतवाडी येथील नळपाणी योजना पूर्ण
रजपूतवाडी येथील नळपाणी योजना पूर्ण
Published on : 16 March 2023, 4:19 am
रजपूतवाडीत नळपाणी पुरवठा योजनेची पाहणी
प्रयाग चिखली ः रजपूतवाडी (ता. करवीर) येथील जलजीवन मिशन हर घर जल या योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा सुधारणा योजनातून पंचवीस लाख किंमतीचे दोन हजार चारशे पाच मीटर लांबीचे संपूर्ण गावात नळ कनेक्शन पूर्ण झाले. योजनेची पाहणी ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता श्री प्रसादवारटके, शाखाअभियंता सिध्दार्थ कांबळे, ठेकेदार अविनाश पाटील यांनी केली.पाणी शुध्दीकरण, पाण्याचा नळापर्यत दाब, पाईप गेज तपासणी,पाईप जमीनीतील खोली याची सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी सरपंच राजेंद्र कोळी, उपसरपंच अमृता कोळी, गटनेते रामसिंग रजपूत, सदस्य प्रवीण कांबळे, मंदा पाटील, शोभा चव्हाण, गीता शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.