सापडलेले दागिने व्यापाऱ्याकडून परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सापडलेले दागिने व्यापाऱ्याकडून परत
सापडलेले दागिने व्यापाऱ्याकडून परत

सापडलेले दागिने व्यापाऱ्याकडून परत

sakal_logo
By

सापडलेले दागिने व्यापाऱ्याकडून परत
पेठवडगाव, ता. ३ : धान्याच्या दुकानात सापडलेले दोन लाख किमतीचे सोन्याचे दागिने व्यापाऱ्याने प्रामाणिकपणे परत केले. महिलेची अतिशय गरीब परिस्थिती असून, मोलमजुरी करून जमवलेल्या पैशातून तिने दागिने केले होते. दागिने मिळताच तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
येथील धान्य ओळ लाईनमध्ये बाळासो कोरे यांचे धान्याचे होलसेल व रिटेल दुकान आहे. शनिवारी चारच्या सुमारास एक महिला धान्य खरेदीसाठी आली होती. महिलेच्या हातात पिशवी होती. पिशवीत एक छोटे पाकिट होते. धान्य घेताना ते पाकिट त्यांनी बाहेर काढून ठेवले. गडबडीत त्या धान्य घेऊन गेल्या, परंतु त्यांचे पाकिट त्याच ठिकाणी राहिले. ते विनोद कोरे यांना मिळाले. त्यांनी त्यात काय आहे हे न पाहता तसेच ठेवले. विसरलेले असल्यामुळे ते कोणीतरी चौकशीसाठी येईल, अशी अपेक्षा होती; परंतु त्यादिवशी कोणीही आले नाही. दरम्यान, रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत एक महिला आली. तिने पाकिटाची चौकशी केली. यानंतर तिने किती दागिने आहेत, हे सांगितले. व्यापारी विनोद यांनी काही प्रतिष्ठित लोकांना बोलावून त्यांची असल्याची खात्री करून त्यांना परत केले. पाकिटात दोन कानांतील फुले, वेल, नेकलेस, घंटण असे चार तोळ्यांचे दागिने होते. दागिने सुखरूप परत मिळाल्यामुळे तिच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आले. महिला मेस चालवून उदरनिर्वाह करतात.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02759 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top