
शाहु राजांना अभिवादन
01616
पेठवडगांवला विविध कार्यक्रमांतून अभिवादन
पेठवडगांव, ता. ६ : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त वडगाव शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. वडगाव शहरात शाहु महाराजांनी महालक्ष्मी तलाव, पालिकेची स्थापना असे विविध कामे केली आहेत.यामुळे शहरातील अनेक संस्था,संघटना,शाळा,महाविद्यालयांनी विविध कार्यक्रम आयोजीत केले होते. यादव आघाडीतर्पे शहरातील प्रमुख चौकात शंभर सेकंद स्तब्धता पाळुन व विविध कार्यक्रम घेवुन शाहु महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी चौकात माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पुजन झाले.
शाहू महाराज यांनी बांधलेल्या महालक्ष्मी तलावाचे पाणी पुजन सकाळी माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते झाले. यानंतर मशाल व मोटारसायकल रैलीस सुरुवात झाली.ही रॅली सरसेनापती धनाजीराव जाधव,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,बळवंतराव यादव यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
दहा वाजता सायरन वाजल्यानंतर १०० सेकंद स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आले.यावेळी सर सेनापती धनाजीराव मर्दानी आराखडा यांच्या वतीने चित्तधरारक युध्द कलेची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ,माजी उपनगराध्यक्ष डॉ.अशोक चौगुले,पोलिस निरिक्षक भैरु तळेकर,गुरुप्रसाद यादव,जवाहर सलगर,संदिप पाटील,अनिता चव्हाण,संगिता मिरजकर,अभिजित पोळ,अभिजित गायकवाड,संपत नायकवडी,राजेंद्र देवस्थळी,अदिलशहा फकीर,नितिन दिंडे,सचिन चव्हाण,संजय सुर्यवंशी,शितल कोळी,सुजय दिंडे,गौरव पाटील,जयकुमार गणपते,रमेश दाभाडे उपस्थित होते. वडगाव नगरपालिकेच्या वतीने महालक्ष्मी तलाव ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.महालक्ष्मी तलावाचे पुजन चित्रकार सपत नायकवडी यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसिलदार कल्पना ढवळे,शिवप्रतिष्ठाचे शशिकांत पिसे,धनजंय गोंदकर,मंडलधिकारी गणेश बरगे,तलाठी जाधव,नगरपालिकेचे प्रकाश पाटील,मेघराज घोडके,आशिष रोटे,शिवाजी सलगर,संतोष गुरव सह नागरिक उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02760 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..