पुनावाला स्कूलमध्ये जेइइ, एइइटीचे प्रशिक्षण केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनावाला स्कूलमध्ये जेइइ, एइइटीचे प्रशिक्षण केंद्र
पुनावाला स्कूलमध्ये जेइइ, एइइटीचे प्रशिक्षण केंद्र

पुनावाला स्कूलमध्ये जेइइ, एइइटीचे प्रशिक्षण केंद्र

sakal_logo
By

पूनावाला स्कूलमध्ये
जेईई, एइइटीचे प्रशिक्षण केंद्र

पेठवडगाव, ता. ९ : येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, आय. आय. टी. अँड मेडिकल ॲकॅडमी सुरू झाली आहे. यासाठी झेनिथ करिअर ॲकॅडमीच्या मदतीने जेईई, एइइटी परीक्षेचे अद्यावत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेच्या सचिव विद्या पोळ, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन(आयएसटीई) नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी दिली.
ते म्हणाले, ‘इंजिनिअरिंग पूर्व परीक्षा आयआयटी, जेईई, सीईटी, व्हीआयटी इतर, मेडिकल पूर्व परीक्षा (एनइइटी, जीआयपीएमइआर, एआयएमइआर) तसेच आर्किटेक्चर पूर्व परीक्षांचे (एनएटीए, जेइ(२)) याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तज्‍ज्ञ व अनुभवी शिक्षक, नियमित सराव परीक्षा, पालक भेट, विद्यार्थीनिहाय अभिप्राय, वैयक्तिक मार्गदर्शन, करिअरविषयक मार्गदर्शन अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.’
महाराष्ट्र राज्य तंत्र-शिक्षण मंडळ, मुंबईचे निवृत्त उपसचिव प्रा. विजय वैद्य, शासकीय तंत्रनिकेतनचे माजी प्राचार्य के. पी. कुंभार, डॉ. रणजित सावंत उपस्थित होते. समन्वयक डॉ. माधवी सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. सरदार जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02761 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top