
पेठवडगाव:साडीने गळा आवळून वृध्देच्या खुनाचा प्रयत्न
वृद्धेचा गळा आवळून
खून करण्याचा प्रयत्न
जुने पारगावात प्रकार; माहीतगाराचे कृत्य
पेठवडगाव, ता. ७ : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील वृद्धेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. सोनाबाई पांडुरंग शिंदे (वय ८५, सह्याद्री कॉलनी, अमृतनगर) असे वृद्धेचे नाव आहे.
सोनाबाई शिंदे नातेवाईकांसमवेत अमृतनगर येथील घरात राहत होत्या. घरातील सर्वजण दोन दिवसांपूर्वी परगावी गेल्याने त्या घरात एकट्याच होत्या. आज पहाटे तीनच्या सुमाराला अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात घुसली. आवाजाने शिंदे झोपेतून उठल्या. दरम्यान अनोळखीने साडीने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. वृद्धेने प्रतिकार करताच त्यांना मारहाण केली. साडीचा फास करून गळ्याभोवती आवळल्याने त्या बेशुद्ध झाली. त्यानंतर संशयित साडीने तोंड बांधून पसार झाला. आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. त्यांचा पुतण्या डॉ. सुनील पाटील यांच्यासह नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. वृद्धेला शासकीय रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर आहे. वृद्धा घरी एकटीच असल्याने चोरीच्या उद्देशाने माहीतगाराने हे कृत्य केले असावे, असा नातेवाईकांचा संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू असल्याचे वडगाव पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02762 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..