
माने फार्मसीच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील औषध कंपन्यांना भेट
माने फार्मसीच्या विद्यार्थ्यांची
गोव्यातील औषध कंपन्यांना भेट
पेठवडगाव, ता. ११ : येथील अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील तृतीय व अंतिम वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यांनी झायडस कॅडीला व युनिकेम औषध कंपनी, गोवा या बहुराष्ट्रीय औषध कंपनीला औद्योगिक भेट देऊन माहिती घेतली. अभ्यास दौऱ्यामध्ये दोनशे विद्यार्थींनी भाग घेतला.
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके शिकवली जातात. ती छोट्या प्रमाणात असते. आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याच्या पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना मिळून ज्ञानात भर पडावी व त्यात पारंगत व्हावे म्हणून या औद्योगिक अभ्यास सहलीचे आयोजन केल्याचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी सांगितले.
झायडस कॅडीला हेल्थ केअर कंपनीचे प्लांट हेड सुमित साळुंखे, प्रॉडक्शन विभागाचे प्रमुख सुधांशू जेना, प्रॉडक्शन मॅनेजर दिगंबर पारपोळकर यांनी कंपनीमधील वेगवेगळ्या विभागाची माहिती, उत्पादन दर्जा नियंत्रण विभाग, गुणवत्ता आश्वासन विभाग, पॅकेजिंग, उत्पादन विभाग व त्यासाठी लागणारी वस्तू, यंत्रे व उपकरणे तसेच औषधी गोळ्या तयार करण्यासाठी लागणारी वस्तू, उपकरणे याची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांचे सहकार्य लाभले. याकामी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने व जिल्हा परिषद सदस्या मनिषा माने यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02765 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..