पान २ क्राईम पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २ क्राईम पटा
पान २ क्राईम पटा

पान २ क्राईम पटा

sakal_logo
By

06691
किणी: बसने धडक दिल्यानंतर वाहनांची झालेली दुरवस्था

किणी नाक्यावर बसचा
ब्रेक फेल पाच वाहनांना धडक
घुणकी : पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) पथकर नाक्यावर पथकर देण्यासाठी उभारलेल्या वाहनांवर ब्रेक निकामी झालेल्या बसची पाठीमागून धडक बसल्याने कारमधील दोघेजण जखमी झाले. धडकेत चार कारचे नुकसान झाले. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. माहिती अशी--पुण्याहून बेळगावकडे प्रवाशांना घेऊन निघालेल मोटार (एम-एच-४६- बीक्यू १९०९), कार (एम.एच.०४-डी.जे. ७९७८) यासह अन्य दोन गाड्या एकमेकांना धडकल्या.बसच्या धडकेमुळे अन्य चार वाहनांचा अपघात झाला. बससह कारमध्ये प्रवाशी होते. दोघेजण वगळता प्रवाशी बचावले.


खोतवाडीत अडीच तोळे दागिने चोरीस
इचलकरंजी : खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील उघड्या घरातून अडीच तोळे दागिने चोरीस गेले. एकूण ६५ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला. याची फिर्याद राम दत्तात्रय खोत (वय ३२) यांनी पोलिसांत दिली. खोतवाडी येथे हनुमान मंदिराच्या मागे खोत यांचे घर आहे. घरातील कपाटातून सुमारे दोन तोळे वजनाचे ५० हजार रुपयांचे गंठण तसेच अर्धा तोळे वजनाचे सुमारे १५ हजाराचे सोन्याचे गुंड चोरीला गेले. हे आज खोत यांच्या निदर्शनास आले. खोत कुटुंबीय घरी असताना दागिने चोरीला गेले.

फसवणुकीबद्दल पाचजणांवर गुन्हा
पेठवडगाव : मोबाईलवर चालनाऱ्या कॅसिनो जुगारात एकाची फसवणूकप्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी जिंकलेले ३२ लाख ५० हजार न दिल्यामुळे फसवणूक केल्याचा गुन्हा वडगाव पोलिसात नोंद झाला. या प्रकरणी अक्षय माने, चंद्रकांत जाधव (दोघे वडगाव), काबूल मोमीन (पूर्ण नाव व  पत्ता माहीत नाही), मोहन व महेंद्रभाई गणात्रा व अनिल निर्मळे, अमित ठक्कर जुगार कंपनी मालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अक्षय माने व त्याचा कामगार चंद्रकांत जाधव यांनी मोबाईलवर चालणारा विनलकी गो ऑनलाईन कॅसिनो जुगार सुरू केला होता. यात जीवन बापूसो सुतार याने २० ते २१ जानेवारीला हजार रुपये खर्चून ३२ लाख ५० हजार रुपये जिंकले होते. ही रक्कम संबंधितांकडे मागणी केली असता देण्यास सशंयितांनी टाळाटाळ केली. सुतार यांना दमदाटी व शिवीगाळ करून धमकी दिली. सुतार यांनी चौकशी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार फिर्यादीवरून फसवणूक, धमकी आदी कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील करीत आहेत.

वाटमारीप्रकरणी तिघांवर गुन्हा
कुरुंदवाड ः दत्तवाड (ता. शिरोळ) येथील टाकळीवाडी रस्त्यावर दुचाकीस्वारास तिघांनी अडवून दुचाकी व २१ हजारांची वाटमारी केल्याप्रकरणी संतोष तराळ, रामा कांबळे व पृथ्वीराज वसंत खरपी (तिघे रा. दत्तवाड ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल झाला. अजित आप्पासो काणे (रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ) याने फिर्याद दिली. बुधवारी सायंकाळी अजित मोटारसायकलवरुन दत्तवाडहून टाकळीवाडीकडे गावी जाताना तराळ, कांबळे व खरपी हे मोटारसायकलवरुन येऊन काणे यांच्या आडवी दुचाकी लावून तिघांनी दोन हजाराची मागणी केली. मागणी मान्य न केल्याने धक्काबुक्की करत मारहाण केली व काणे याचे २१ हजार रुपये काढून घेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


बेळगुंदीत मारहाणीबद्दल दोघांवर गुन्हा
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथे प्रदीप कांबळे याला शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच रमेश मगदूम व अनूज मगदूम या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता. ११) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले, थळ देवाच्या यात्रेत जेवण वाढण्यावरुन प्रदीप व तुकाराम कांबळे यांच्यात वाद झाला होता. तो तेथेच मिटलाही होता. यात्रेसाठी आणलेला साऊंड बॉक्स देण्यासाठी प्रदीप व मंडळातील मुले रामदास मगदूम यांच्या घरी गेले त्यावेळी रमेशने दंगा करण्यास मस्ती येते का? असे म्हणून प्रदीपला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यास प्रदीप, त्याचे चुलते व मंडळातील मुले गेले असता त्यावेळी रमेशने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अनूजने प्रदीपच्या डाव्या हातावर पोटावर व पाठीवर काठीने मारहाण केली. या घटनेची फिर्याद प्रदीपने पोलिसात दिली.


खूनप्रकरणी आज तारदाळ बंद इशारा
तारदाळ : येथील महादेव ऊर्फ दादासो निगडे या युवकाच्या खून प्रकरणाच्या निषेधार्थ सर्व पक्षीय संघटनेतर्फे उद्या (ता.१३) गाव बंदची हाक दिली आहे. तर संशयितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी निषेध रॅली काढण्यात येणार आहे. निगडे याचा खून करून आंबा घाटात मृतदेह टाकला होता. या प्रकरणी गावातीलच तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचे गावात तीव्र पडसाद उमटले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02768 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top