
पाण्यापासुन एकही गाव वंचीत रहाणार नाही ः आमदार आवळे
01622
पाण्यापासून एकही गाव वंचित
राहणार नाही ः आमदार आवळे
पेठवडगाव, ता. १२ : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघातील काही गावांना पाणीटंचाई जाणवत आहे; परंतु त्याबाबतीत गांभीर्याने दखल घेऊन, तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. मजले गावाचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. त्यासाठी आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली.
महात्मा फुले सहकारी सूतगिरणीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याबाबत तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘हातकणंगले तालुका टँकरमुक्त आहे; परंतु काही मोजक्या गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याबाबतीत उपाययोजना राबवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तालुक्यातील अडतीस गावांना जलजीवन पाणी योजनेचे प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर आहेत. नऊ गावांच्या प्रस्तावांची वर्क ऑर्डर झाली आहे. मजले गावाच्या बाबतीत वारणा नदीवरून चार कोटी ९१ लाखांच्या योजनेस तत्वतः मंजुरी मिळाली आहे. ती झाल्यास या गावाचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे. तातडीचे उपाय राबवण्याच्या सूचना तहसीलदार, ग्रामविकास पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. मतदारसंघात कोणत्याही गावात पाणी टंचाई जाणवू देणार नाही.’ पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, नायब तहसीलदार प्रमोद गायकवाड, नारायण रामण्णा, उपअभियंता एस. बी. कुलकर्णी, सरपंच सिकंदर कोठावळे, शाखा अभियंता परेश आलटकर, तसेच ग्रामसेवक प्रमोद मुसळे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02769 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..