क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम
क्राईम

क्राईम

sakal_logo
By

सावर्डेत दोन कुटुंबात मारामारी
पेठवडगाव : सावर्डे (ता. हातकणंगले) येथील दोन कुटुंबात पूर्वीचे भांडणाचे कारणावरून मारामारी झाली. या घटनेत दोन्ही गटातील जखमी झाले आहेत.
याप्रकरणी दोन्ही गटांच्या परस्पर विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ही घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी आमानउल्ला मोमीन, जबाउल्ला मोमीन, साजीद डंगरे, यास्मिन मोमीन, दिलशाह डोंगरे, जुल्फिकार मोमीन, सज्जाद मोमीन, शौकत डंगरे (सर्व सावर्डे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी अलिम मोमीन (वय २४, रा. मोमीन मशिद मागे, सावर्डे) हे व संशयीत आरोपी भाऊबंद आहेत. जकाऊल्ला मोमीन व अन्य यांनी घरात घुसून शिवीगाळ करून लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली. दुसऱ्या घटनेत जक्का मोमीन, सना मोमीन, अलीफ मोमीन, मीनाज मोमीन, इबाद मोमीन निलोफर मोमीन, अली मोमीन (सर्व रा. सावर्डे) यांच्या विरोधात शौकत महम्मद डंगरे (वय ४२) यांनी तक्रार दिली आहे. या सात जणांनी पूर्वीच्या कारणावरून भांडणे करून काठी, खोरे याने मारहाण केली अशी तक्रार दिली आहे. तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.


रांगोळीत युवकाची आत्महत्या
रांगोळी : येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ओंकार मोहन घोडके असे त्याचे नाव आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चुलत्याच्या घरी त्याने खुंटीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02770 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top