
माने फार्मसीच्या आठ संशोधनाच्या पेटंटची नोंदणी
माने फार्मसीच्या आठ संशोधनाच्या पेटंटची नोंदणी
पेठवडगाव, ता. १३ : येथील अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी व वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अंबप व अशोकराव माने फार्मसी महाविद्यालय सावे येथील प्राध्यापकांना आठ विषयातील संशोधन पेटंटची नोंदणी झाली. मुंबई येथील विभागीय कार्यालयात नोंदणी केली. डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. डी. आर. जडगे, डॉ. एन. बी. चौगुले, डॉ. ए. एस. कुलकर्णी यांनी ए नोवेल म्युसिलेज पावडर ऑफ लेपीडिअम सतीवम ऍज पावडर बाईंडर इन टॅबलेट डोसेज या विषयात, प्रा. व्ही. एम. पाटील व प्रा. व्ही. एस. पट्टणकुडे यांनी ए नोवेल कंपोझिशन फोर डायबिटिक सायकलिक कंपौंडस अँड प्रिपरेशन मेथड: नॉवेल कॉम्पोसिशन फॉर अँटिडियाबेटिक कंट्रोल ऑफ डायबेटिक हैपेर्ग्लयसिमीया अँड डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स या विषयात, डॉ. एस. ए. बंडगर यांनी ड्रग डिलिव्हरी सिस्टीम फॉर ओव्हरीण कॅन्सर या विषयात व प्रा. व्ही. आर. ढोले यांनी एन्डोलॅक लोडेड ट्रान्स फेरोसोमस, कॅलसिपोतरिओल लोडेड एथोसोमस फॉर सोरायसिस, पोर्टेबल सोलर ब्रीफकेस या विषयात संशोधन करून पेटंटची नोंदणी केली. डॉ. एस. ए. बंडगर यांनी नॅनो पार्टीकल्स ऑफ सिसप्लॅस्टिन फॉर ओव्हरीण कॅन्सर या विषयात आस्ट्रॉलीयन पेटंटची मान्यता मिळाली.
प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील म्हणाले, ‘‘महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनाची नोंद राज्यपातळीवर घेतली. त्यामुळे महाविद्यालयाचा वैज्ञानिक व संशोधनात्मक दृष्टिकोन वाढला आहे. याचीच फलश्रुती म्हणूनच एकाच वेळी आठ पेटंटची नोंदणी झाली असून त्याचे श्रेय संस्थेस आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02772 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..