
किणीजवळ तिहेरी अपघातात तिघे भाविक ठार, एक गंभीर
1672
किणी (ता. हातकणंगले) ः पुणे-बंगळूर महामार्गावर येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात चक्काचूर झालेली मोटार.
(छायाचित्र ः संतोष माळवदे)
किणीजवळ तिहेरी अपघातात
तिघे भाविक ठार, एक गंभीर
कंटनेरवर आदळलेल्या मोटारीला मागून ट्रकची धडक
सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता. २ : पुणे- बंगळूर महामार्गावर किणीजवळ मोटार, ट्रक आणि कंटेनर अशा तिहेरी अपघातात देवदर्शनासाठी निघालेले तीन प्रवासी जागीच ठार झाले. एक गंभीर जखमी आहे. चौघेही शिर्डी देवस्थानला जात होते. या अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघात काल (ता. १) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झाला.
त्यात त्रिलेश कुमार (वय ४२), संजना माहेश्वरी (२७), जिथ्था त्रिलेश (११, रा. सर्व बसवेश्वरनगर, बंगळूर) अशी मृतांची नावे आहेत. अरिनी एन. (४१) गंभीर जखमी आहे.
बसवेश्वरनगरातील त्रिलेश कुमार सहकुटुंब मोटार (केए ०२- एम ६६१२)मधून शिर्डीला जात होते. दरम्यान, कंटेनर (एमएच ११- सीएच २७७९)चा एक्सेल तुटल्याने तो महामार्गावरील किणी गावाजवळ वळणावर थांबला होता. मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान मोटारीने बेशिस्त थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली. याचवेळी मोटारीच्या मागून येणाऱ्या ट्रकने (केए २७- बी ५४४५) अपघातग्रस्त मोटारीला मागून जोराची धडक दिली. दोन्ही बाजूंनी धडक बसल्याने मोटारीचा चक्काचूर झाला. अपघातात मोटारीतील त्रिलेश कुमार, संजना माहेश्वरी, जिथ्था त्रिलेश जागीच ठार झाले. अरिनी एन. गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले.
अपघाताच्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावून गेले. नागरिकांच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले. या अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली. पोलिस निरीक्षक भैरव तळेकर तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02824 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..