शरद कारखान्याचे मिल रोलर पुजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद कारखान्याचे मिल रोलर पुजन
शरद कारखान्याचे मिल रोलर पुजन

शरद कारखान्याचे मिल रोलर पुजन

sakal_logo
By

01678
नरंदे (ता. हातकणंगले) : येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन करताना अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर व आदित्य पाटील-यड्रावकर व मान्यवर. (छायाचित्र : राहुल मोरे, जयसिंगपूर)

शरद कारखान्याचे
मिल रोलर पूजन
पेठवडगाव, ता. ८ : नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे हस्ते झाले. पूजाविधी संचालक आदित्य पाटील-यड्रावकर, संचालक आप्पासो चौगुले यांच्या हस्ते झाला.
गत हंगामात पूर्ण कार्यक्षमतेने उसाचे गाळप केले. येणारा हंगाम उत्तम रीतीने पूर्ण करण्यासाठी कारखान्याचे नियोजन सुरू आहे. हंगामपूर्व तांत्रिक दुरुस्त्या करून सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत. सभासदांच्या पाठबळावर हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला जाईल, असे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष थबा कांबळे, सुभाषसिंग रजपूत, दशरथ पिष्टे, लक्ष्मण चौगुले, शिवगोंडा पाटील, संजय बोरगावे, अण्णासो सुतार, गुंडा इरकर, संजय नांदणे, अजित उपाध्ये, रावसाहेब चौगुले, बाबासो भोकरे, जवाहर पाटील, आदिनाथ आरबाळे, आनंदा कुम्मे, राजकुमार भोसले, दिलीप मगदूम, भैरू हंकारे, भरतकुमार चौगुले, सी. बी. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी व अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02830 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top