पेठवडगाव वार्तापत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव वार्तापत्र
पेठवडगाव वार्तापत्र

पेठवडगाव वार्तापत्र

sakal_logo
By

लोगो- पेठवडगाव नगरपालिका
--
पारंपरिक आघाडीतच रंगणार सामना
येथील निवडणूक पक्षपातळीवर होण्याची शक्यता नाही. युवक क्रांती महाआघाडी, यादव आघाडीतच लढत होणार आहे. दोन्ही गट जरी राष्ट्रीय पक्षांबरोबर असले तरीही ते पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत. कार्यकर्त्यांची जुळवा-जुळव, बैठका व उमेदवारांची चाचपणीला वेग आला आहे. अचानक जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे मातब्बर उमेदवार शोधण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागणार आहे.
-विवेक दिंडे

आजपर्यंत दोन्ही गटातच कायम लढत झाली आहे. मागील निवडणुकीत प्रविता सालपे गटाने युवक क्रांती महाआघाडी स्थापन करुन काही पक्ष, संघटना यांना एकत्र करत लढत दिली होती. यात त्यांना यश आले होते. माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी यादव आघाडीकडून लढा दिला होता. परंतु, त्यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. राज्यातील घडामोडीचा परिणाम येथील राजकारणावर होणार नाही. मुळात शिवसेनेचे दोन्ही गट उद्धव ठाकरे यांना मानणारे आहेत. ते दोन्ही गट दोन आघाडीत आहेत. शहरप्रमुख संदीप पाटील व युवा सेनाप्रमुख अनिल माने गतवेळी सालपे आघाडीबरोबर होते. ते सध्या यादव आघाडीत आहेत, तर त्यांचेच कार्यकर्ते अंकुश माने, सुनील माने सालपे गटात आहेत.
गेल्यावेळच्या पराभवामुळे यादव आघाडी सावध पावले टाकत आहे. गेली दीड वर्षे त्यांनी चांगलीच तयारी केली आहे. गटातून गेलेले नगरसेवक गुरुप्रसाद यादव यांचे इनकमिंग झाले आहे. सत्ताधारी नगरसेवक संदीप पाटील, शिवाजी पुतळ्याकडील तरुणांचा एक गट यादव आघाडीत आला आहे. युवक क्रांती महाआघाडीच्‍या आघाडी प्रमुख प्रविता सालपे, रंगराव पाटील-बावडेकर, मोहनलाल माळी, सुकूमार पाटील, अजय थोरात नेतृत्व करीत आहेत. विकासकामांपेक्षा अंतर्गत मतभेदाची घरघर त्यांना लागली आहे. विकास आराखड्यामुळे शहरातील अनेक भागात नाराजीचा सूर आहे.
डॉ. अशोक चौगुले भाजपमध्ये सक्रिय आहेत. ते कोणती भूमिका घेणार हे महत्त्‍वाचे आहे. यापूर्वीची निवडणूक त्यांनी भाजपतर्फे लढवली होती. त्यात यश आले नसले तरी त्यांनी घेतलेली मते एखाद्या गटास उभारी देऊ शकतात.

चौकट
बावडेकरांचे बंड झाले थंड
माजी नगरसेवक रंगराव पाटील-बावडेकर हे युवक क्रांती आघाडीचे स्थापनेचे सदस्य आहेत. परंतु, पाच वर्षांत काही कारभारींमुळे ते नाराज झाले होते. पहिल्यांदा त्यांच्या मनातील खद-खद त्यांनी संघटनेतील काही प्रमुख मंडळींसमोर मांडली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या कारणावरुन त्यांच्यातील दरी वाढत गेली. ती राजीनाम्यापर्यंत पोचली. ते विरोधी आघाडीच्या गळाला लागतात असे दिसल्यावर आघाडी खडबडून जागी झाली. त्यांनी घरात जाऊन विनंती केली. कारभाऱ्यानेही जाहीर माफी मागितली. यामुळे भावुक झालेल्या पाटील यांचे बंड थंड झाले.

चौकट
घडामोडी काय?
आराखड्याचा विषय गाजणार
बंडखोरांचे आव्हान
उमेदवारी देताना होणार तारांबळ
भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेना स्थानिक आघाडीत

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02836 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..