खासदार धैर्यशील मानेंचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार धैर्यशील मानेंचे स्वागत
खासदार धैर्यशील मानेंचे स्वागत

खासदार धैर्यशील मानेंचे स्वागत

sakal_logo
By

01718
----------
खासदार धैर्यशील मानेंचे स्वागत
पेठवडगाव, ता. १४ : एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय हा माझा वैयक्तिक नव्हता. माझ्यावर टाकलेली मतदारसंघाची जबाबदारी व विकास यांना सर्वोच्च स्थान आहे. याशिवाय माझ्याबरोबर असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठी शिंदे गटात गेलो. या निर्णयानंतर माझे झालेले स्वागत हृदयात कोरणारे आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार धैर्यशील माने यांची स्वागत रॅली, तिरंगा रॅलीचा सांगता समारंभ व माजी सैनिकांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. हजारो युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली किणी येथून आलेल्या तिरंगा रॅलीची उत्साहात सांगता झाली. रॅली किणी टोल नाक्यापासून सुरू होऊन पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सांगता झाली. आदगोंडा पाटील, हसुरे, कलगोंडा पाटील, व्ही. बी. माने या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला. दरम्यान, किणी पथकर नाक्यावरही स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02869 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..