तरुणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणावर गुन्हा
तरुणावर गुन्हा

तरुणावर गुन्हा

sakal_logo
By

आत्मदहनाच्या प्रयत्नाबद्दल
घुणकीतील एकावर गुन्हा
वडगावात थरार; पोलिसांचे प्रसंगावधान

पेठवडगाव, ता. १६ : पंधरा ऑगस्टला वडगाव पोलिस ठाण्याच्या आवारात तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला. याप्रकरणी प्रदीप शिवाजी कुंभार (वय २६, घुणकी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप कुंभार यांच्यावर विनयभंग, जबरी चोरी, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत. विनयभंग पीडित मुलगी व तिच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी त्याने आत्मदहन करण्याचा अर्ज वडगाव पोलिसांनी दिला होता; परंतु तक्रारीत तथ्य नसल्यामुळे तक्रार घेतली नाही.
कुंभार याने इशारा दिल्याने पोलिस आवारात पोलिसांनी सतर्कता ठेवली होती. सकाळी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदनाची तयारी सुरू होती. दरम्यान, प्रदीप मोटारसायकलवरून ठाण्याच्या आवारात आला. प्लास्टिक कॅनमधील ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत जवळ आला तर स्फोट होईल, अशी धमकी देऊ लागला. त्याच्या तोंडास फेस येऊ लागल्यामुळे त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. याप्रकरणी पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02874 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..