हजारो भाविकांची उपस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हजारो भाविकांची उपस्थिती
हजारो भाविकांची उपस्थिती

हजारो भाविकांची उपस्थिती

sakal_logo
By

१७३६

वडगावात अंबाबाईच्या नावे जागर
पारंपरिक उत्साहात यात्रा; हजारो भाविकांची उपस्थिती
पेठवडगाव, ता. २८ : येथील ग्रामदैवत अंबाबाईची यात्रा उत्साहात झाली. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’ या गजराने येथील अंबाबाई मंदिराचा परिसर गजबजून गेला. यात्रेस हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यात्रेनिमित्त सर्वधर्मीय महिला भाविक नैवेद्य घेऊन दर्शनासाठी जातात. देवीची पूजा विजय गुरव यांनी केली. ॲड. विजय पोळ यांच्या हस्ते अभिषेक घालून विधिवत पूजा केली. माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ व विजयादेवी यादव यांच्याहस्ते आरती झाली. ५० वर्षांपासून भाविकांच्या परंपरागत अन्नदानातून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, गुरुप्रसाद यादव, सुनील हुक्केरी, अभिजित गायकवाड, विजय शहा, विलास सणगर, संजय सूर्यवंशी, नितीन दिंडे, मियाँलाल पटवेगार, बाळासो जंगम उपस्थित होते.
विजयसिंह यादव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्याचे विद्यार्थी व जयभवानी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसाद वाटप केले. ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता ठेवली. मंदिर परिसरात विविध खेळण्यांची दुकाने, मिठाई, हॉटेल, चहागाडे, पाळणे अशी विविध मनोरंजनाची दुकाने थाटलेली होती. दरम्यान, यादव कॉलनी येथील कर्नाटकी अंबाबाई मंदिरात माजी उपनगराध्यक्ष धनाजी पाटील, सचिन पाटील, तसेच व्यंकटेश्वर ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे वाटप केले.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02884 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..