पेठवडगावला गणेश विसर्जन शांततेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगावला गणेश विसर्जन शांततेत
पेठवडगावला गणेश विसर्जन शांततेत

पेठवडगावला गणेश विसर्जन शांततेत

sakal_logo
By

पेठवडगावला गणेश विसर्जन शांततेत http://172.18.0.100/SmartNews/Images/SmartFlow/increaseTxt.png
पेठवडगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात व ढोल-ताशा, हलगीसह साउंड सिस्टीमच्या दणक्यात ८० पेक्षा अधिक गणेश मंडळांनी गणपतीचे विसर्जन केले. गणेश मंडळांच्या स्वागतासाठी यादव आघाडी आणि युवक क्रांती आघाडीतर्फे मंडळांच्या कार्यकर्त्यांचे नारळ, पान-सुपारी देऊन स्वागत करण्यात आले. विसर्जन स्थळावर पालिका, पोलिस प्रशानाने कडक बंदोबस्त ठेवला होता.
मंडळांच्या मिरवणुका पालिका चौक, पद्मा‍रोड, शिवाजी पुतळामार्गे कोल्हापूर रोड ते गणेश मंदिरशेजारील तलाव अशी निघाली होती. या वर्षी साउंड सिस्टीमवरील निर्बंध उठवल्यामुळे दणदणाट जोरात होता. काही मंडळांनी पालखी, लेझिम, ढोल-ताशा, हलगी अशा वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. गणेश मंदिरशेजारील तलावात विसर्जनाची सोय केली होती. याठिकाणी निर्माल्य साठवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. काही तरुण कार्यकर्ते गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मदत करीत होते. सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारापर्यंत विसर्जन सुरू होते. सहारा तरुण मंडळाने पालिका चौकात आतषबाजी, लाईट शो, छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा स्त्रोत्र सादर केले. लायन मेंबर्स गणेश मंडळाने देशपर गीतांचा देखावा सादर केला. हिंदुस्थान ग्रुप, क्रांतिवीर तरुण मंडळाने साउंडसिस्टीम, वाद्यांसह लेसर शो सादर केला. साजन ग्रुपने पालखीतून मिरवणूक काढली.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02895 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..