बाजार समिती आवारात शुक-शुकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती आवारात शुक-शुकाट
बाजार समिती आवारात शुक-शुकाट

बाजार समिती आवारात शुक-शुकाट

sakal_logo
By

पेठवडगावातील जनावरांचा बाजार बंद
‘लम्पी’च्या संसर्गाची धास्ती; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प

पेठवडगाव, ता. १२ : ‘लम्पी’चा संसर्ग टाळण्यासाठी येथील आज सोमवारचा जनावरांचा बाजार बंद ठेवला. बंदमुळे वडगाव बाजार समितीच्या आवारातील व्यापारी, शेतकऱ्यांची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बाजारा समिती आवारात शुकशुकाट होता.
जिल्ह्यात काही ठिकाणी ‘लम्पी’ संसर्गजन्य त्वचारोग होऊन जनावरे आजारी असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या आजाराची लागण झाल्याची एक घटना हातकणंगले तालुक्यातील आळते येथे घडली. या पार्श्‍वभूमीवर शासनाने आदेश दिल्यामुळे बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वडगाव बाजार समिती जिल्ह्यातील प्रमुख उलाढाल असणारी संस्था आहे. संस्थेची आणखी एक शाखा इचलकरंजी येथे आहे. तेथेही मोठी उलाढाल होते. या उलाढालीवर अनेक व्यवसाय अवलंबून आहेत; परंतु हा रोग पसरू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने बंदचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आज बाजार पूर्ण बंद होता. याबाबत बाजार समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘वडगाव बाजार समितीला शासनाचा आदेश आला होता. त्यानुसार शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून व पशुधनाचे नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. दूध संघाच्या वतीने लसीकरण सुरू आहे. रोगावर नियंत्रण आल्यानंतर पूर्ववत बाजार सुरू होईल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02898 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..