प्रकृती गंभिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकृती गंभिर
प्रकृती गंभिर

प्रकृती गंभिर

sakal_logo
By

वाठार तर्फ वडगावात
मारहाणीत तरुण गंभीर
किरकोळ वादातून प्रकार; सहा जणांवर गुन्हा
पेठवडगाव, ता. १४ : वाठार तर्फ वडगाव येथील कुंभार गल्लीतील एकाच्या घरासमोर किरकोळ कारणावरून एका तरुणास मारहाणन झाली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्नालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सहा तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश कुंभार, शुभम कुंभार, विकास कुंभार (सर्व वाठार) व इतर दोघे अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत राहुल मल्लेश कांबळे (२७, रा. दत्त कॉलनी, साखरवाडी वाठार) गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.
आनंदा कुंभार यांना दारू का पाजली, असा जाब विचारत गणेश कुंभार याने राहुल कांबळे याला शिवीगाळ केली. कुंभार वाड्यात का दंगा करतोस असे म्हणून शुभम कुंभार यांना जातीवाचक शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. अन्य तरुणांनी चप्पलाने, हाताने मारहाण केली. राहुल कांबळे यांच्या घरातील सोडवण्यास आले असता त्यांनाही काठीने, हाताने मारहाण केली. विकास कुंभार याने राहुलला बेल्टने मारून गंभीर दुखापत केली. गंभीर जखमी राहुल याच्यावर पारगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला सीपीआर व नंतर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02902 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..