वडगावमध्ये रविवारी झिम्मा-फुगडी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावमध्ये रविवारी झिम्मा-फुगडी स्पर्धा
वडगावमध्ये रविवारी झिम्मा-फुगडी स्पर्धा

वडगावमध्ये रविवारी झिम्मा-फुगडी स्पर्धा

sakal_logo
By

वडगावमध्ये रविवारी झिम्मा-फुगडी स्पर्धा
पेठवडगाव, ता. १६ : येथील कल्याणी सखी मंचच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा रविवारी (ता. १८) होणार असून दोन लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतराची भूमिका निभावणारी योगिता चव्हाण ही सिनेतारका उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्षा विद्या पोळ यांनी दिली.
त्या म्हणाल्या, ‘‘स्पर्धेबरोबर उखाणे, जात्यावरील ओव्या, पारंपरिक वेशभूषा या स्पर्धाही होणार आहेत. बळवंतराव यादव हायस्कूल येथे रविवारी सकाळी दहा वाजता स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धा स्थानिक व परगावांतील ग्रुप या दोन विभागात असणार आहे. वडगावनगरीच्या प्रथम महिला नगराध्यक्षा विजयादेवी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या प्रोत्साहनातून स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत प्रथम २१ हजार, द्वितीय १५ हजार, तृतीय १० हजार, चतुर्थ क्रमांकासाठी ५ हजार रुपये रोख रक्कम याप्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे. वैयक्तिक ५०० ते १००० रुपयांपर्यंतची आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेत प्रवेश विनामूल्य आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02906 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..