वडगावमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धा
वडगावमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धा

वडगावमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धा

sakal_logo
By

01754
-------
वडगावमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धा
---
पेठवडगाव, ता. १८ : सत्ता असो वा नसो, समाजासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले काम समाज कधीही विसरत नाही. याप्रमाणे (कै.) विजयसिंह यादव यांचा वारसा चालविणाऱ्या विद्याताई पोळ यांनी घराण्याचा वारसा जपलेला आहे. सर्वसामान्य महिलांना सन्मानाने जगण्याची हिंमत, आत्मबळ देण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन माजी नगरसेविका शशिकला पिसे यांनी केले.
येथील कल्याणी सखी मंचाच्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे उद्‌घाटन सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते झाले. धस्का चित्रपटांच्या कलाकरांनी हजेरी लावून उपस्थितांची मने जिंकली.
विजयादेवी यादव अध्यक्षस्थानी होत्या. मंचाच्या अध्यक्षा विद्याताई पोळ, लता सूर्यवंशी, शोभा देसावळे, ऊर्मिला उंडाळे, संगीता मिरजकर प्रमुख उपस्थित होत्या. सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यात कमलादेवी गायकवाड, तुळसाबाई पाटील, सोनाबाई पाटील, शशिकला पिसे, शहीदाबी शिकलगार, रुक्मिणी दाभाडे, शकुंतला पिसे, शालिनी उंडाळे, रुक्मिणी दुर्गुळे, लक्ष्मीबाई बसागरे, हिराबाई पिसे, बेबीताई कुंभार, स्नेहल भोसले आदींचा सत्कार करण्यात आला. तुळसाबाई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, अभिजित गायकवाड, वैजयंता पाटील, शांतादेवी गडदे, मनीषा संकपाळ, अर्चना भोपळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ptv22b02908 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..