वडगावमध्ये आजपासून व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावमध्ये आजपासून व्याख्यानमाला
वडगावमध्ये आजपासून व्याख्यानमाला

वडगावमध्ये आजपासून व्याख्यानमाला

sakal_logo
By

वडगावमध्ये आजपासून व्याख्यानमाला
पेठवडगाव, ता. २५ : येथील ब्राह्मण समाज संघातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त शारदीय ज्ञानसत्र व्याख्यानमाला आयोजित केली आहे. २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत दिगंबर जैन मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये रोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत व्याख्यानमाला होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन ब्राह्मण समाज संघामार्फत अध्यक्ष अमोल चरणकर, उपाध्यक्ष प्रमोद देवस्थळी, कार्यवाह अॅड. समीर मुंगळे यांनी केले आहे.
व्याख्याते (कंसात विषय) असे ः सोमवारी (ता. २६) मधुकर पाटील (आमचा मान, आमचा सन्मान, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज), ता. २७ - डॉ. रणजित चिकोडे (योग आणि जीवनशैली ), ता. २८ - माजी प्राचार्या कमला हर्डीकर (आपले उत्सव, शास्त्र आणि विज्ञान ), ता. २९ - संपतराव चव्हाण (चला हसत जगूया, ग्रामीण कथाकथन), ता. ३० - चित्कला कुलकर्णी (संत वाङ्मयातील पक्षी) , ता. १ आक्टोबर - विसुभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात ) ता. २ - श्रीनिवास पेंडसे (हुतात्मा अनंत कान्हेरे ). ता. ३ - अनंत धर्माधिकारी (भावगीते, नाट्यगीते).