‘शिवाजीराजे’तर्फे तेरा टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिवाजीराजे’तर्फे तेरा टक्के लाभांश
‘शिवाजीराजे’तर्फे तेरा टक्के लाभांश

‘शिवाजीराजे’तर्फे तेरा टक्के लाभांश

sakal_logo
By

01766
‘शिवाजीराजे’तर्फे तेरा टक्के लाभांश
पेठवडगाव ः आर्थिक मंदी, बाजारपेठेतील मरगळ, बँकांमध्ये स्पर्धा असूनही शिवाजीराजे संस्थेच्या ठेवीत वाढ झाली आहे. सभासदांनी दाखवलेला विश्‍वास हीच पोच पावती आहे. संस्थेच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अजय थोरात यांनी केली.
येथील श्री. शिवाजीराजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलत होते. उपाध्यक्ष संजय कदम, माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, अरुण पाटील उपस्थित होते.
संस्थेचे सभासद साहिल शिकलगार यांचा व शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा, स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. संस्थेच्या ठेवीत झालेली वाढ, कर्जवाटप व केलेली गुंतवणूक याचे मान्यवरांनी कौतुक केले. संचालक सुरेंद्र जंगम, बाळासो पाटील, देवेंद्र राणे, सतीश ताटे, खलील कवठेकर, शरद गुरव आदी उपस्थित होते. मुख्य व्यवस्थापक संतोष नांगरे यांनी सूत्रसंचालन केले. खलील कवठेकर यांनी आभार मानले.