पेठवडगाव:सावकारी प्रकरणी दोघांच्यावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:सावकारी प्रकरणी दोघांच्यावर गुन्हा
पेठवडगाव:सावकारी प्रकरणी दोघांच्यावर गुन्हा

पेठवडगाव:सावकारी प्रकरणी दोघांच्यावर गुन्हा

sakal_logo
By

बेकायदा सावकारीप्रकरणी दोघांवर गुन्हा

पेठवडगाव, ता.१६: बेकायदा सावकारीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. संतोष देसाई (रा. मिरज), निखिल नागनाथ चव्हाण (रा. सावर्डे, ता. हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी निखिल रमेश कांबळे (वय २६, रा.सावर्डे) यांनी आईच्या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपये नऊ टक्के व्याजाने मित्र निखिल चव्हाण यांचे दाजी संतोष देसाई यांच्याकडून २० सप्टेंबर २०२० ला घेतले होते. या रकमेचे व्याजासह २ लाख सोळा हजार रुपये परत केले. तरीही निखिल चव्हाण आणखी ६८ हजार रुपये मागत होता. तसेच त्याने सावर्डे बसस्टॉपवर निखिल कांबळे यास बोलावून दमदाटी केली. त्यानंतर त्याचे दाजी संतोष देसाई यांनी फोनवरून निखिल याला शिवीगाळ व दमदाटी करून धमकी दिली. याप्रकरणी पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर, पतंगराव रेणुसे करीत आहेत.