गळीत हंगाम शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गळीत हंगाम शुभारंभ
गळीत हंगाम शुभारंभ

गळीत हंगाम शुभारंभ

sakal_logo
By

०१७९२
नरंदे : २१ व्या गळीताचा प्रारंभ आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व पत्नी स्वरुपा यांच्या हस्ते ऊस मोळी टाकून झाला. याप्रसंगी अदित्य पाटील, संजय पाटील, दशरथ काळे व मान्यवर.
...................

इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविणार
आमदार डॉ. राजेंद्र पाटील :‘शरद’च्या गळीत हंगामाचा प्रारंभ

पेठवडगाव, ता. १८ : खत, डिझेल, मजुरीच्या वाढत्या दरांचा विचार केला तर साखर उत्पादनांवर विसंबून चालणार नाही. यासाठी शरद साखर कारखान्याने वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण केला. याशिवाय डिस्टिलरी प्रकल्प उभारुन उत्पादन सुरू केले. यापासून चाळीस हजार लिटर इथेनॉल उत्पादन सुरू आहे. ते लवकरच प्रतिदिनी एक लाख लिटर होईल, असे प्रतिपादन अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी केले.
नरंदे (ता. हातकणंगले) येथे कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभी ते बोलत होते. याप्रसंगी संचालक आदित्य पाटील, स्फूर्ती पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर), त्रिशला पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील (शिरोळ) उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘गतवर्षी एफआरपी २८०० असतानाही २९०५ रु. एकरकमी एफआरपी दिली. यावेळीही एकरकमी देण्याची भूमिका घेतली. साखरेच्या उत्पादनावर अवलंबून न राहता अन्य उत्पादनांवर लक्ष द्यावे. यासाठी इथेनॉल प्रकल्प हाती घेतला.’ याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे (कुरूंदवाड), भोला कणसे, सतीश मलमे यांची भाषणे झाली. यावेळी कारखाना उपाध्यक्ष थबा कांबळे, प्रेमीला मुरगुंडे, दादासाहेब पाटील, मल्लाप्पा चौगुले, दशरथ काळे, अरुण पाटील, संचालक रावसाहेब भिलवडे, आप्पासाहेब चौगुले, अभिजीत भंडारी, पोपट भोकरे, बी. के. चव्हाण, संपतराव पाटील, शंकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी, अनिल पाटील उपस्थित हाेते. सुभाषसिंग रजपूत यांनी स्वागत, डी. बी. पिष्टे यांनी आभार मानले.