पेठवडगाव:चाकू हल्ला मुलगा जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:चाकू हल्ला मुलगा जखमी
पेठवडगाव:चाकू हल्ला मुलगा जखमी

पेठवडगाव:चाकू हल्ला मुलगा जखमी

sakal_logo
By

पित्याचा मुलावर चाकूहल्ला
पेठवडगाव,ता.१ : राष्ट्रीय महामार्गावरील एका हाॅटेलजवळ घरगुती वादातून पतीने मुलावर चाकूने हल्ला केल्यामुळे मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी विशाल विठ्ठल इनामदार (रा. पिंपरी ता. खटाव जि. सातारा )याच्यासह आणखी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसातून मिळालेली माहिती
योगिणी इनामदार यांचा विशाल याच्याशी २०१५ ला विवाह झाला होता. दरम्यान दोघांत घरगुती कारणावरून वाद असल्याने योगिनी वडिलांकडे राहण्यास आहेत. दोघेही विभक्त राहतात. त्यांच्यात पोटगीचा दावा सुरू आहे. दरम्यान सोमवारी (ता. ३१) रात्री राष्ट्रीय महामार्गालगत पूनम हाॅटेलजवळ योगिनी मुलग्यासमवेत वडिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. भेटून मोपेडवरून परतताना पती विशालने चाकूने हल्ला केला. यामध्ये पुढे बसलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर वार झाल्यामुळे मोठी जखम झाली. घटनास्थळी नागरिक जमा झाल्यामुळे विशालने साथीदारासह पलायन केले. या जीवघेण्या हल्ल्यात मुलगा जखमी झाल्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजाणे, पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी भेट दिली. याबाबतची फिर्याद योगिनी इनामदार (रा. मराठानगर, पेठवडगाव) यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक भीमगोंडा पाटील, हवालदार पतंगराव रेणुसे तपास करीत आहेत.