बार मालकास धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार मालकास धमकी
बार मालकास धमकी

बार मालकास धमकी

sakal_logo
By

खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा

पेठवडगाव, ता. ४: बार मालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल झाला. ही घटना काल रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी रितेश बाळासो पाटील (रा. पेठवडगाव)याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथील गवत मंडईमधील एका बारमध्ये जेलमधून सुटून आलोय, असे सांगत रितेश पाटील याने वडगावचा डॉन आहे, असे धमकावत दररोज दारू व प्रतिमहिना २ हजारांची खंडणी मागितली. या वेळी दंगा करत, बार मालकास मारहाण करून शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच हॉटेलच्या दर्शनी भागाचे नुकसान केले. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण बनले होते. याबाबतची फिर्याद रोहन नाझरे यांनी दिली. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस हवालदार शोभा कुंभार करीत आहेत.