माने इन्स्टिट्यूटच्या ३०५ विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माने इन्स्टिट्यूटच्या ३०५ विद्यार्थ्यांची निवड
माने इन्स्टिट्यूटच्या ३०५ विद्यार्थ्यांची निवड

माने इन्स्टिट्यूटच्या ३०५ विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

माने इन्स्टिट्यूटच्या ३०५ विद्यार्थ्यांची निवड
पेठवडगाव, ता. ५ : वाठार तर्फ वडगाव येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधील अंतिम वर्षातील ३०५ विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य ‘प्लेसमेंट हब’ होण्याच्या दृष्टीने अशोकराव माने इन्स्टिट्यूट प्रयत्नशील असल्याचे संचालक डॉ. एच. टी. जाधव यांनी सांगितले. अंतिम वर्षातील ३०५ विद्यार्थ्यांची टीसीएस, इन्फोसिस, कॅपजेमिनी, टाटा मोटर्स, भारत फोर्ज, ॲसेंचर, विप्रो, ॲटॉस सिंटेल, टेक महिंद्रा, फ्लुईड रोबोटिक्स, डब्ल्यूटीई इन्फ्रा, केएसपीजी ऑटोमेशन, फोरेसिया, टीई कनेक्टिव्हिटी, आयटीसी इन्फोटेक, अल्टिमेट्रिक, जॉन डियर, टाटा मोटर्स, एव्हर इलेक्ट्रॉनिक्स, फोर्ड मोटर्स, कॉग्निझंट, माईंड ट्री यांसारख्या विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. विद्यार्थ्यांना कंपन्यांतर्फे ३.५ लाखांपासून ते ८ लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज दिले आहे.
शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्रामध्येच १५० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महाविद्यालयातर्फे उर्वरित अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होण्यासाठी मेकॅनिकल, सिव्‍हिल, इलेक्ट्रिकल, ई अँड टीसी व कॉम्प्युटर सायन्स आदी विभागांमधील निवडक १९० विद्यार्थ्यांना सॉफ्टस्कील व मुलाखतीसंबंधी पंधरा दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा माने, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. एच. टी. जाधव, ॲकॅडमीक डीन प्रा. प्रवीण घेवारी, ट्रेनिंग-प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अविनाश उथळे आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.