पेठवडगाव:जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने महाशिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने महाशिबीर
पेठवडगाव:जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने महाशिबीर

पेठवडगाव:जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने महाशिबीर

sakal_logo
By

वडगावमध्ये विधी सेवा प्राधिकरण
शिबिरात दाखल्यांचे वितरण

पेठवडगाव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांचे महाशिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे १२०० नागरिकांना विविध शासकीय कार्यालयातील दाखल्यांचे वितरण करण्यात आले. शिबिराचे उद्‍घाटन न्या. एस. आर. साळुंखे यांच्या हस्ते झाले. शिबिरात आरोग्य, शिक्षण, महसूल, महिला व बालकल्याण, महा ई-सेवा केंद्र, कृषी, पालिका, पंचायत समिती, पाटबंधारे, वन, पोस्ट ऑफिस, भूमी अभिलेख, समाजकल्याण आदी विविध विभागाच्या सेवा पुरविण्यात आल्या. पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप न्या. साळुंखे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. एम. पाटील, न्या. के. आर. सिंघल, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. ए. बाफना, न्या. एल.एम पठाण, न्या. एस. डी. सोनावणे, न्या. एस. डी. शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बार कौन्सिल महाराष्ट्र, गोवाचे उपाध्यक्ष व्ही. एम. घाटगे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडसे, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्याधिकारी विद्या कदम, शबाना मोकाशी, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ उपस्थित होते.