भादोले येथील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भादोले येथील घटना
भादोले येथील घटना

भादोले येथील घटना

sakal_logo
By

भादोलेत अनोळखी महिलेचा मृतदेह
पेठवडगाव : भादोले (ता. हातकणंगले) येथील गायरानमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये अनोळखी बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे वय अंदाजे ५० असून अंगाने सडपातळ, रंग गव्हाळ, उजव्या पायाने अपंग आहे. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
.......

वडगावमध्ये विनापरवाना मांस विक्रीप्रकरणी गुन्हा
पेठवडगाव : विनापरवाना गोवंश कत्तल, मांस विक्री, साठा करणे या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला. या कारवाईत एक लाख ८६ हजारांचे मांस, कातडी जप्त करण्यात आली. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी करीम हुसेन बेपारी, अस्लम सिराज बोपारी, गौस कमाल बेपारी, इरफान खुदबुद्दीन बेपारी (सर्व रा. बेपारी गल्ली, पेठवडगाव), शेखर पोळ, शुभम पोळ, माणिक पोळ (रा. पोळ गल्ली, पेठवडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस योगेश राक्षे यांनी दिली आहे. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.