विनापरवाना दारू दोघांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनापरवाना दारू दोघांवर कारवाई
विनापरवाना दारू दोघांवर कारवाई

विनापरवाना दारू दोघांवर कारवाई

sakal_logo
By

विनापरवाना दारू दोघांवर कारवाई
पेठवडगाव : राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ विनापरवाना दारू कंटेनरमधून घेऊन जाताना दोघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून चौदा लाखांची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त केली. इब्राईम हकीम खान (वय २२), सत्तार मिठा खान (वय २७, दोघे रा. आत्मज, अगडवा, जि. जालोर, राजस्थान) यांना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इब्राईम व सत्तार हे कंटनेर ट्रकमधून विनापरवाना गोवा बनावटीची विदेशी दारूचे बॉक्स घेऊन जाताना महाराष्ट्र दारूबंदीअंतर्गत कारवाई केली. कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे व पोलिसांनी केली. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.