वडगावात रविवारी करीअर फेअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावात रविवारी करीअर फेअर
वडगावात रविवारी करीअर फेअर

वडगावात रविवारी करीअर फेअर

sakal_logo
By

वडगावात रविवारी करीअर फेअर
गुलाबराव पोळ; तज्ञ, अभ्यासक करणार मार्गदर्शन
पेठवडगाव, ता.१८ : येथील डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कुलमध्ये देश, विदेशातील पंचवीसपेक्षा अधिक विद्यापिठांचे करीअर फेअर व एक्झिबिशन रविवारी (ता. २०) होणार आहे. यामध्ये करिअरच्या अनेक संधीबाबत तज्ञ, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमासाठी दहावी-बारावी विद्यार्थी, पालक यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याहस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, डॉ. एस. एन. सफाली यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी व विविध अभ्यासक्रम यांची माहिती नसते. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, करिअरच्या वाटा समजाव्यात या उद्देशाने पुनावाला स्कुल, आयएसटीई(दिल्ली), झेनित करिअर अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
करिअर फेअर, सायन्स एक्सपो आणि आर्ट ॲड क्राप्ट एक्झिबिशन होणार आहे. मेळाव्यात भारतातील व परदेशातील पंचवीसपेक्षा अधिक विद्यापीठ भाग घेणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील पाचशेपेक्षा अधिक अभ्यासक्रमांची व करिअरच्या संधीबद्दल माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले विज्ञान प्रकल्प आणि आर्ट क्राप्टचे प्रदर्शन भरवलेले आहे. सकाळी दहा ते पाच वेळेत प्रदर्शन तर दुपारी तीन ते पाच दरम्यान करिअर कॉन्फरन्स होणार आहे. संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. संस्थेच्या सचिव सौ. विद्याताई पोळ, प्राचार्य डॉ. सरदार जाधव, समुपदेशिका डॉ. माधवी सावंत, समन्वयक अश्‍विनी पाटील, अतुल पोळ उपस्थित होते.
----
चर्चासत्रातील मार्गदर्शक
चर्चासत्रासाठी आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई (न्यू दिल्ली), सचिव विजय वैद्य, महाराष्ट्र, गोवाचे प्रमुख डॉ. रणजीत सावंत, आण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य डॉ. अशोक वाली, डॉ. नामदेव जाधव, माजी पोलिस प्रमुख गुलाबराव पोळ मार्गदर्शन करणार आहेत.