चौगुले बँकेच्या अध्यक्षपदी चौगुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौगुले बँकेच्या अध्यक्षपदी चौगुले
चौगुले बँकेच्या अध्यक्षपदी चौगुले

चौगुले बँकेच्या अध्यक्षपदी चौगुले

sakal_logo
By

चौगुले बँकेच्या अध्यक्षपदी चौगुले
उपाध्यक्षपदी विजय नाईक; निवडणूक बिनविरोध
पेठवडगाव, ता. २३ : येथील डॉ. आण्णासाहेब चौगुले अर्बन को-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. अमरनाथ आण्णासो चौगुले यांची, तर उपाध्यक्षपदी विजय सदाशिव नाईक यांची निवड झाली.
कोल्हापूर, सांगली कार्यक्षेत्र असणारी या बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक डॉ. प्रगती बागल यांनी काम पाहिले. संस्थेची स्थापना १२ ऑक्टोबर १९५७ ला डॉ. आण्णासाहेब चौगुले यांनी केली. सध्या बँकेच्या १४ शाखा आहेत. संस्थेकडील वसूल भागभांडवल १९६ लाख, रिझर्व्ह फंड १६.२५ कोटी, ठेवी १२२ कोटी, कर्जे ७५ कोटी, गुंतवणूक ५७ कोटी, उलाढाल २०० कोटी व्यवसाय आहे. बॅंकेस स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ आहे.
२०२२-२७ साठी निवड झालेले अन्य संचालक मंडळ असे - सुवर्णादेवी चौगुले, अजितसिंह पाटील, विजय बोरगल्ली, धैर्यशील पवार, प्रीतम पाटील, अनिल कोपार्डे, पूजा चौगुले, कुंदा गुरव, महादेव तेली, बाळासो गुडाळे, राजगोंडा पाटील, सचिन पाटील, सदाशिव लिंबारी कांबळे. नवीन संचालक मंडळाचा सत्कार केला. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र गोंदकर उपस्थित होते.