
पेठवडगाव:वडगाव पोलिसांची १३६ जणांविरुद्ध कारवाई
वडगाव पोलिसांची १३६ जणांविरुद्ध कारवाई
पेठवडगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक असलेल्या गावांत पोलिस ठाणे हद्दीतील १३६ जणांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. अशांतता निर्माण करणाऱ्या १२ गावांतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी दिली. वडगाव परिसरातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यात पोलिस ठाणे हद्दीतील सावर्डे, कापूरवाडी, भेंडवडे, भादोले, घुणकी, तळसंदे, चावरे, नवे चावरे, जुने पारगाव, नवे पारगाव, अंबप, अंबपवाडी अशा बारा गावांचा समावेश आहे. निवडणूक शांततेत होण्यासाठी निवडणूक असलेल्या गावातील अशांतता पसरविणाऱ्यांवर व जुने गुन्हे नोंद असलेल्यांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. पोलिस प्रशासनाने निवडणूक असलेल्या गावातील उपद्रवी म्हणून पोलिसांच्या यादीत असलेल्यांवर कारवाई केली आहे.