इंदिरा वसाहतीत घाणीचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदिरा वसाहतीत घाणीचे साम्राज्य
इंदिरा वसाहतीत घाणीचे साम्राज्य

इंदिरा वसाहतीत घाणीचे साम्राज्य

sakal_logo
By

01844
-----------
इंदिरा वसाहतीत घाणीचे साम्राज्य
वडगाव पालिकेकडे तक्रार करूनही दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारा
विवेक दिंडे ः सकाळ वृत्तसेवा
पेठवडगाव, ता. १९ : प्रचंड दुर्गंधी, डास, माश्‍या, कचरा यामुळे इंदिरा वसाहतीमधील नागरिकांना निरोगी जगणे अवघड झाले आहे. गावातील कचरा येथे टाकल्यामुळे व स्वच्छता न ठेवल्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेकडे सातत्याने तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे या प्रश्‍नावर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
येथील गावातील कचरा टाकण्याचे ठिकाण तासगाव रोडवरील इंदिरा वसाहतीजवळ आहे. गावातील कचरा एकत्रित करून तो येथे एका शेडमध्ये व त्याच्या मागे असणाऱ्या उघड्या मैदानावर फेकून दिला जातो. अनेक वर्षे येथे कचरा उघड्यावर फेकला जात आहे; परंतु या कचऱ्याचे निर्गतीकरण झालेले नसल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात साठलेला आहे. परिसरात मोठ्या संख्येने सर्वसामान्य, गरीब लोक बेघर योजनेतून व काही खासगी जागा घेऊन राहिले आहेत. कचरा मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे डास, माश्‍यांचे प्रमाण वाढत जाते. त्याचा त्रास नागरिकांच्या आरोग्यावर होतो.
याशिवाय कचरा डेपोमध्ये शहरातील चिकण विक्री करणाऱ्या दुकानदारांचे वेस्ट मटेरियल मोठ्या प्रमाणात उघड्यावर फेकले जाते. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेले मांस याजागी पुरले आहे. ते खाण्यासाठी भटकी कुत्री एकत्र जमून ते बाहेर काढल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुले व वयस्करांना त्याचा त्रास होत आहे.
कचरा डेपोच्या देखरेखीसाठी काही कर्मचारी नेमले आहेत; परंतु ते याजागी दिसत नाहीत. कचरा रिसायकल करण्यासाठी एक शेड बांधून तेथे मशिनरी आणल्या आहेत.; परंतु सध्या ते काम बंद आहे. त्यामुळे कचरा अधिक-अधिक साचत आहे. कचऱ्यापासुन खत निर्मितीसाठी शेड बांधली आहे. अनेक दिवस त्याजागी तसाच कचरा पडलेला आहे.
-----------------
या परिसरातील घाणीसंदर्भात तक्रारी असतील, तर ताबडतोब औषध फवारणी करून स्वच्छता केली जाईल. मांस, मटण टाकल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याबाबतीत लवकरच उपाययोजना करणार आहे. शहरातील चिकण वेस्ट, मृत्यू झालेले प्राणी यांची विल्हेवाट लावण्यासाठी ॲनिमल डिस्पोजल मशिनची मागणी केली आहे. ते महिना अखेरीस येईल, त्यानंतर तक्रार राहणार नाही.
- सौ. सुप्रिया गोडेकर, कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी व पर्यावरण, वडगाव नगरपालिका