
वनविभागाची टिम दाखल
01851
...
मौजे तासगावमध्ये बिबट्याला
पकडण्यासाठी सापळा
वनविभागाचे पथक लक्ष ठेवून
पेठवडगाव, ता. ३० : मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथील सिद्धोबाच्या डोंगरात ठाण मांडून असलेल्या बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले आहे. या टीमने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावला आहे.
मौजे तासगाव येथील महेश पाटील यांची गोसंजीवनी गोशाळा आहे. या गोशाळेत शंभरहून अधिक गायींचे पालन केले जाते. या गोशाळेच्या दक्षिण बाजूस घनदाट जंगल व दरी आहे. दोन दिवसांपूर्वी येथील गायीच्या खोंडावर बिबट्याने झडप घालून त्याला जंगलात ओढत नेले व ठार मारले. हा खोंड अर्धवट खाल्ल्याच्या अवस्थेत गोशाळेतील कामगारांना दिसून आला. यानंतर त्यांनी वनविभागास त्याची माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेरे लावून बिबट्या असल्याची खात्री केली. आज सायंकाळी वनविभागाचे पथक दाखल झाले असून, या पथकाने बिबट्या येत असल्याच्या मार्गावर लोखंडी सापळा लावला आहे. वनविभागाच्या पथकात प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, विनायक माळी, आशुतोष सूर्यवंशी, अलमतिन बांगी यांचा समावेश आहे.