पेठवडगाव:विहीर पडून मुलीचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:विहीर पडून मुलीचा मृत्यु
पेठवडगाव:विहीर पडून मुलीचा मृत्यु

पेठवडगाव:विहीर पडून मुलीचा मृत्यु

sakal_logo
By

01869
पेठवडगावला विहिरीत बुडून
चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पेठवडगाव, ता. १८ : विहिरीत बुडून एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सानू ऊर्फ अरीशा सद्दामहुसेन सुतार (वय ४) असे मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, भिलवडी (ता. पलूस) येथील सद्दामहुसेन सुतार यांची मुलगी सानू ऊर्फ अरीशा ही मुलगी अजोबा दिलावर शेख यांच्याकडे येथील कैकाडी गल्ली जवळ रहाण्यास आहे. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सानू दारात खेळता खेळता गायब झाली. त्यामुळे तिचा शोध सुरू होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बातमी संपूर्ण शहराच पसरली. दरम्यान, त्यांच्या घराच्या मागे तक्या पीराची जागा आहे. या जागेत पडीक विहीर आहे. ती विहीर पाच ते सहा फूट पाण्याने भरलेली आहे. काही तरुणांनी या विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी या मुलीचे चप्पल पाण्यात तरंगताना दिसले. यावेळी गल्लीतील अरुण नाईक, दीपक नाईक या तरुणांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता तिचा मृतदेह पाण्यात मिळाला. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. दरम्यान, विहिरीतील मृतदेह काढताना बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची नोंद रात्री उशिरा पोलिस ठाण्यात झाली आहे.