
जीनियस स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
जीनियस स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
पेठवडगाव, ता. १९ : येथील जीनियस इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन व पारितोषिक उत्साहात झाले. भारताचा ऐतिहासिक ते आधुनिक प्रवास ही थीम सादर केली. पारितोषिक वितरण दलित मित्र अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या वेळी विद्यार्थ्यांनी खेळाचे विविध प्रात्यक्षिके सादर केले. प्रात्यक्षिकात लेझीम, मल्लखांब, जम्परोप, आर्चरी, योगा, लाठीकाठी, एरोबिक्स, जिम्नॅस्टिक्स आदी खेळ सादर केले. त्यामधून मल्लखांब खेळाला विशेष पारितोषिक जाहीर केले. शाळेचे अध्यक्ष महेश पोळ यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलन झाले. प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक पुंडलिक पोळ होते. जीनियस स्टुडंट हा ॲवॉर्ड अवधूत चव्हाण याला दिला. जीनियस टीचर ॲवॉर्ड शुभांगी कोपर्डे यांना दिला. जीनियस आयकॉन हा पुरस्कार विनय पोळ व संस्कृती पाटील यांना दिला. स्टुटंट ऑफ द इयर सिद्धी कबुरे हिला दिला. दहावीच्या विद्यार्थिनींचा हवेतील रिंग डान्स हे खास आकर्षण राहिले. श्रावणी चव्हाण, लिबा मोमीन, प्रतीक्षा घाटगे, पूर्व पाटील व त्रिशा घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. तेजस्विनी भंडारे व सान्वी हिरवे यांनी आभार मानले.