Thur, June 1, 2023

कल्याणी शिशू विहारचे स्नेहसंमेलन
कल्याणी शिशू विहारचे स्नेहसंमेलन
Published on : 21 February 2023, 4:06 am
कल्याणी शिशू विहारचे स्नेहसंमेलन
पेठवडगाव : येथील कल्याणी शिशू विहारचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. याचे उद्घाटन संस्थेच्या उपाध्यक्षा विजयादेवी यादव व सचिवा विद्याताई पोळ यांच्याहस्ते झाले. माजी नगरसेवक सुनिल हुक्केरी, डॉ. सायरस पुनावाला स्कूलचे प्राचार्य डॉ. सरदार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्यक्रमात विविध नृत्ये, देशभक्तीपर गीत, शिवरायांच्या जीवनावर आधारित गीत अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. बळवंतराव यादव हायस्कूलचे प्राचार्य अविनाश पाटील, संस्थेचे कार्यवाह अभिजीत गायकवाड, शोभा देसावळे, श्रृती महाजन, संतोष सणगर आदी उपस्थित होते. संभाजी पाटील यांनी सुत्रसंचलन केले. मुख्याध्यापिका गिरीजा देवस्थळी यांनी अभार मानले.