शिवचरित्र पारायण सोहळ्याचा राष्ट्रीय विक्रम

शिवचरित्र पारायण सोहळ्याचा राष्ट्रीय विक्रम

01907
----------
शिवचरित्र पारायण सोहळ्याचा राष्ट्रीय विक्रम
आदर्श गुरुकुल ॲकॅडमीचा राष्ट्रीय विक्रम ५५५ विद्यार्थ्यांनी राबवला
पेठवडगाव, ता. १९ : येथील आदर्श गुरुकुल ॲकॅडमीमध्ये राबवलेल्या ५५५ विद्यार्थ्यांच्या गुरुकुल शिवचरित्र पारायण सोहळ्याची राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झाली.
यावेळी आमदार प्रा. जयंत आसगाकर, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी शिक्षण सभापती प्रविण यादव, शिक्षक नेते दादासाहेब लाड, शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूरचे एस. डी. लाड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड चे अध्यक्ष सुनील पाटील व पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख डॉ. अंजना जाधव यांच्याहस्ते राष्ट्रीय विक्रमाची नोंद असलेले प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरवले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ''गुरुकुल शिवचरित्र पारायण सोहळा'' साजरा केला. कृष्णराव अर्जुन केळूसकर लिखित छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथाचे १३ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान दररोज ४ तास वाचन केले. ५५५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अशा उपक्रमाचे आयोजन करणारी आदर्श गुरुकुल अकॅडमी ही भारतातील पहिली आणि एकमेव शिक्षण संस्था ठरली आहे. या विशेष उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या विक्रमाची नोंद ''एशियन बुक ऑफ रेकॉर्डस्'' मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून केली.
आमदार आसगावकर म्हणाले, ‘गुरुकुल शिवचरित्र पारायण सोहळ्याचे संकल्पक दत्तात्रय घुगरे यांचे विशेष कौतुक आहे. मोबाईल संस्कृतीत अडकलेल्या या पिढीला खरा इतिहास शिकवण्याचे कार्य आपल्याकडून घडत आहे.’ डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले,‘या ५५५ विद्यार्थ्यांनी आपल्या ५५५ कुटुंबात शिवरायांचे विचार घेऊन जावेत आणि त्याची व्याप्ती वाढून वाचन संस्कृती वाढण्यास सर्वांना प्रेरित करावे.’ आमदार राजूबाबा आवळे यांनी ही संकल्पना महाराष्ट्रात राबवण्यासाठी आमदार फंडातून आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे यांनी प्रास्ताविक केले. सचिव सौ. महानंदा घुगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे अमर इंगवले व सौ. सिमा बाबर यांनी सुत्रसंचलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com