पेठवडगाव:प्रा.प्रदीप गायकवाड यांना पीएच.डी पदवी प्रदान

पेठवडगाव:प्रा.प्रदीप गायकवाड यांना पीएच.डी पदवी प्रदान

01916
------
प्रा. गायकवाड
यांना पीएच. डी.
पेठवडगाव : येथील प्रा. प्रदीप गायकवाड यांना इंग्रजी विषयातील शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी नुकतीच प्रदान केली. त्यांनी ‘इकोक्रिटीकल स्टडी ऑफ द सिलेक्ट नॉव्हेल ऑफ जेनिफर जॉन्स्टन’ या विषयावर विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. त्यांना राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी येथील प्र. प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांचे मार्गदशन लाभले. प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी . प्रा. डॉ. अक्षय सरवदे, प्रा. डॉ. प्रभंजन माने, प्रा. डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बारव्हेकर यांचे सहकार्य लाभले. ते महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे १४ वर्षापासून इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com