पेठवडगाव:शारीरिक संबंध प्रकरणी एकावर गुन्हा

पेठवडगाव:शारीरिक संबंध प्रकरणी एकावर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, युवकावर गुन्हा
पेठवडगाव :लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी व जातीवाचक शिवीगाळ केल्याने रितेश प्रशांत पाटील (वय २२, रा.किणी) या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. किणी (ता. हातकणंगले) येथील रितेश पाटील पाच वर्षांपूर्वी एका महाविद्यालयात शिकत असताना पिडीत युवतीशी त्याची ओळख झाली. नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या दरम्यान त्याने या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. काही दिवसांपूर्वी रितेशने अन्य युवतीशी विवाह केला. हे समजताच पीडित युवतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल़ा. उपचारानंतर तिने वडगांव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com