वडगावला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या

वडगावला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या

01922

वडगावला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या

पेठवडगाव, ता. २७ : चुकीची वाढीव बिले दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्‍यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटेनेतर्फे वडगाव वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. उन्हाळ्यात वीज तोडून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले. विना अट वीजपुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्‍यांनी घेतली. शेवटी चर्चेनंतर आंदोलन मागे घेतले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे म्हणाले, ‘शेतकऱ्‍यांना कोणतीही पूर्व सूचना न देता वीज वितरण कंपनीने शेतीची वीज तोडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. विनाअट वीजपुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही.’
वडगावचे वीज वितरणचे उपअभियंता सचिन जगताप यांनी शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्‍यांनी वीज बिल भरून सहकार्य करावे, अशी भूमिका मांडली. मात्र शेतकऱ्‍यांनी ती नाकारली. संघटनेच्यावतीने उन्हाळ्यात विज कनेक्शन बंद करु नका, चुकीची व वाढीव वीज बिले दुरुस्ती झालीच पाहिजेत, दिवसा शेतीला दहा तास लाईट मिळालीच पाहिजे. आम्हाला फुकटची सहानुभूती नको शेतकऱ्‍यांचे हित लक्षात घ्या या मागणीचे निवेदन उपअभियंता सचिन जगताप यांना दिले.
वीज वितरणचे उपअभियंता सचिन जगताप यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. संतप्त शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही देत जगताप यांनी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याचा आग्रह केला. आंदोलनात तालुकाध्यक्ष आप्पासो एडके, धनाजी पाटील, आण्णा मगदूम, सुनिल देसाई, सुहास देसाई, माणिक पाटील, दिनकर घाटगे, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com