माती, माणसं जोडणारी चंदगडी भाषा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माती, माणसं जोडणारी चंदगडी भाषा
माती, माणसं जोडणारी चंदगडी भाषा

माती, माणसं जोडणारी चंदगडी भाषा

sakal_logo
By

माती, माणसं जोडणारी चंदगडी भाषा
प्रा. डॉ. जयंत कार्तिक; वडगावमधील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कार्यक्रम
पेठवडगाव, ता. २८ : महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात, पण चंदगडी बोलीभाषा ही पूर्णपणे वेगळी आहे. तांबड्या मातीत निर्माण झालेली भाषा ही माती आणि माणसं जोडणारी बोलीभाषा आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. जयंत कार्तिक यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. एस. डी. डिसले होते. डॉ. कार्तिक म्हणाले, ‘चंदगड हा अति दूर्गम व अति पावसाळा असलेला भूप्रदेश आहे. कर्नाटक, गोवा आणि कोकण यांच्या मध्यभागी वसलेल्या चंदगड तालुक्यात आपली अशी स्वतःची बोलीभाषा निर्माण झाली आहे. त्या भाषेवर कोकणी कन्नड पोर्तुगाल व इतर भाषांचा प्रभाव अधिक दिसून येतो. चंदगडी बोलीचे व्याकरणही पूर्णतः भिन्न आहे, त्यामुळे चंदगडी बोली ही हेल काढून बोलली जाते. एकूणच चंदगडी बोली, तिची व्याकरण, वाक्यरचना व बोलण्याची पद्धती ही इतर बोलीपेक्षा खूप भिन्न आहे.’
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डिसले यांनी कोकणी भाषा व चंदगडी बोलीभाषा यांचा कसा सहसंबंध आहे याचे विवेचन केले. कार्यक्रमाला जयप्रकाश एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका प्रा. प्रमिला माने यांचे मार्गदर्शन लाभले. मराठी विभागाचे अधिक विभाग प्रमुख डॉ. प्रा. सर्जेराव पद्माकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. संतोष बिरनाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दिपाली कांबळे यांनी आभार मानले.