
अशोकराव माने फार्मसीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
01951
अशोकराव माने फार्मसीमध्ये
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
पेठवडगाव : संयम, धाडस व चिकाटी असेल, तर सक्षम व्यावसायिक होणे अवघड नाही, असे प्रतिपादन एस. जी. फायटोफॉर्मा कंपनीचे संचालक डी. जी. गुणे यांनी केले. येथील अशोकराव माने फार्मसी व वाठार महाविद्यालयाच्या तीन शाखांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास संस्थाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयीन शिक्षकांच्या सात पुस्तकांचे प्रकाशन झाले.
प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी प्रगतीचा आढावा सादर केला. नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस डॉ. जी. एन. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. सरदार शेळके, सागर जाधव व रवींद्र गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. डी. आर. जडगे, डॉ. नीलेश चौगुले, डॉ. वाय. आर. गुरव, आर. एल. निर्मळे, पी. जे. पाटील, ए. पी. शिरगुपे, डॉ. एस. ए. बंडगर, प्रा. बागल उपस्थित होते. विविध गुणदर्शक कार्यक्रम झाला. ए. पी. जाधव व एन. डी. देसाई यांनी सूत्रसंचलन केले. एस. व्ही. न्हावकर यांनी आभार मानले.