जयशिवराय किसान संघटनेच्यावतीने

जयशिवराय किसान संघटनेच्यावतीने

01954
...

पेठवडगावमध्ये एकदिवसीय अन्नत्याग उपोषण

शेतकरी आत्महत्येच्या निषेधार्थ जयशिवराय संघटनेचे आंदोलन

पेठवडगाव, ता.१९: जयशिवराय किसान संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ एक दिवशीय अन्नत्याग उपोषण आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनास विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला.
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी शेतीमालास दर न मिळाल्यामुळे १९ मार्च १९८६ ला आत्महत्या केली. ही देशातील पहिली शेतकरी आत्महत्या होती.या दिवशी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संघटनेच्या वतीने पालिका चौकात एकदिवशीय अन्नत्याग आंदोलन केले.
नगरपालिका चौकात जय शिवराय किसान संघटना, शरद जोशी प्रणित व रघुनाथदादाप्रणित शेतकरी संघटना,आझाद हिंद क्रांती संघटना व सर्व पक्षांनी पाठिंबा दिला व अन्नत्याग उपोषणात भाग घेतला.
या आंदोलनाच्या सांगताप्रसंगी शिवाजी माने म्हणाले,‘शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यापेक्षा आम्हाला नफ्यावर आधारित दर मिळाला पाहिजे. परिशिष्ट नऊमध्ये असणारे शेतकरी विरोधी कायदे काढून टाकावेत, हवामानाचा अचूक अंदाज दर्शवणारी यंत्रणा देशभर कार्यरत करावी, पाचस्तरीय कर्ज रचना बंद करून ती द्विस्तरीय करावी व सर्व कृषीमाल नियंत्रणमुक्त करावा. सरकारी नोकरांना महागाई निर्देशांक असतो,त्या प्रमाणात शेतमाल पिकवण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांना जशी महागाई वाढेल, त्या प्रमाणात उसासह सर्व शेतमालाला दर मिळण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी रघुनाथदादा पाटील, आझाद हिंद क्रांतीचे मुकुंद पाटील, रावसाहेब ऐतवडे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, गुणाजी शेलार,सदाशिव कुलकर्णी,युवराज आडनाईक,शितल कांबळे,दिलीप माणगावे, शामराव देसाई,प्रताप चव्हाण यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com