वडगावमध्ये चिमणी गणना, मातीची भांडी वाटप

वडगावमध्ये चिमणी गणना, मातीची भांडी वाटप

01957

वडगावमध्ये चिमणी गणना, माती भांडी वाटप

पेठवडगाव, ता. २० : येथील निसर्गप्रेमी मित्र ग्रुपतर्फे जागतिक चिमणी दिवसानिमित्त ग्रामीण व नागरी भागातील चिमण्यांची गणना केली. भादोलेतील पाटील गल्ली परिसरात मातीची घरे, घराशेजारी झुडूपवर्गीय झाडे, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था यामुळे शेकडो चिमण्या पाहायला मिळाल्या. वडगावमध्ये चावडी परिसरात चिमणी गणना केली.
पाच वर्षांपासून ग्रुपतर्फे मातीची भांडी, कृत्रिम घरटे वाटप असे उपक्रम राबवले जातात. नागरिकांना मातीच्या भांड्यांचे वाटप केले. यासाठी इंजिनिअर उदय ढवळे यांचे आर्थिक सहकार्य झाले. महालक्ष्मी देवराई येथे नगरपालिकेमार्फत निसर्गप्रेमी मित्र ग्रुप, योग सेवा फाउंडेशन, देवराईमध्ये श्रमदानात येणाऱ्या नागरिकांना मातीची भांडी वाटप केली. चिमणी गणनेसाठी डॉ. अमोल पाटील, नीलेश घारसे, प्रकाश जगदाळे, अमोल चरणकर, नारायण कोळेकर, डॉ. नीलिमा पाटील, डॉ. विशाल पाटील, योगेश यादव, जयराज तोडकर, समीर जाधव यांनी परिश्रम घेतले.
---------
चिऊताई येत नसल्यास
-सिमेंटची घरे असल्यास कृत्रिम घरटे लावा.
-घराच्या अंगणात, परड्यात झुडूपवर्गीय झाडे लावा.
-दररोज मातीच्या पसरट भांड्यात अंगणात, परड्यात पाणी ठेवा.
-शाळांमध्ये घरटे निर्माण करणाऱ्या कार्यशाळा घ्या.
-शाळेत चित्रकला स्पर्धा, चिमणी गणना उपक्रम चालू करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com