आमदार सतेज पाटील उपस्थित

आमदार सतेज पाटील उपस्थित

01959

अठ्ठावीस वर्षांत महाडिकांनी
राजाराम कारखाना लुटला

सतेज पाटील; पेठवडगावला बैठक

पेठवडगाव, ता. ३० : अठ्ठावीस वर्षे राजाराम कारखाना लुटण्याचे काम महाडिकांनी केले आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण, उपपदार्थ निर्मिती प्रकल्प का केले नाहीत? ते केले असते तर अधिक दर मिळाला असता. त्यांनी राजाराम कारखाना आधुनिक न करता आपला खासगी कारखाना आधुनिक करुन पैसे कमावले. या कारखान्यावर शंभर कोटींपेक्षा अधिक कर्ज आहे. असेच राहिल्यास ते वाढत जाईल व नंतर महाडिक तो कारखाना विकत घेतील, असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.
येथील यादव गटातर्फे छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ, माजी अध्यक्ष सर्जेराव माने उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘जिल्ह्यात ऊस उत्पादनातून साडेतीन हजार तर दूध उत्पादनातुन चार हजार कोटी वर्षाला उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने साखर कारखाना टिकला पाहिजे. गोकुळ दूध संघाची निवडणूक लढलो. मात्र, आमच्या कुटुंबातील एकही संचालक नाही. फक्त दूध उत्पादकांसाठी लढलो. जुन्या माणसांनी कारखाना चांगला चालवला. आज १२२ कोटी कर्ज कारखान्यावर आहे. ते वाढत जाईल. त्यामुळे कारखाना अवसायनात आणून खासगी करण्याचा डाव महाडिकांचा आहे. तो आसुज्ञ सभासद हाणून पाडतील.’
सर्जेराव माने म्हणाले, ‘कारखान्यात महाडिक तज्ज्ञ संचालक म्हणून आले व ते कारखान्याचे मालक झाले. अन्य कारखान्यांपेक्षा दोनशे रुपये दर कायम कमी दिला. रिकव्हरीत फेरफार करुन भ्रष्टाचार केल्यामुळे सभासद त्यांना जागा दाखवतील.’
विद्याताई पोळ म्हणाल्या, ‘ज्या गावाला जायचं आहे त्याचे आम्ही नाव घेत नाही. मात्र वडगाव, हातकणंगले तालुक्यातील सभासद पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अजय पाटील, सुनील हुक्केरी, माजी सरपंच प्रकाश झिरंगे यांची भाषणे झाली. बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी प्रास्ताविक, तर दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com