सुरेश नरके स्पोर्टस् आमदार चषकाचा मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरेश नरके स्पोर्टस् आमदार चषकाचा मानकरी
सुरेश नरके स्पोर्टस् आमदार चषकाचा मानकरी

सुरेश नरके स्पोर्टस् आमदार चषकाचा मानकरी

sakal_logo
By

01989
----------
सुरेश नरके स्पोर्टस् आमदार चषकाचा मानकरी
वडगाव शहर काँग्रेसतर्फे आमदार प्रीमिअर क्रिकेट स्पर्धा; अश्वमेध स्पोर्टस् उपविजेता
पेठवडगाव, ता. ५: वडगाव शहर काँग्रेसतर्फे आयोजित आमदार प्रीमिअर क्रिकेट स्पर्धेचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस वाठार येथील सुरेश नरके स्पोर्टस्‌ने पटकावले. या संघास आमदार चषक २०२३ व रोख रक्कम देऊन सन्मानित केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार राजू आवळे यांच्याहस्ते व पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या उपस्थितीत केले.
येथील वडगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे आमदार प्रीमिअर क्रिकेट स्पर्धा छ. राजर्षी शाहू क्रीडागंण येथे घेतल्या. सावर्डेचा डॉ. अमोल जाधव यांच्या ''अश्वमेध स्पोर्टस् '' उपविजेता ठरला. सचिन पाटील यांच्या ‘वडगाव प्रेस क्लब’ संघाने तृतीय तर पँथर ग्रुप संघाने चौथे पारितोषिक पटकावले.
आमदार राजू आवळे म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील. ग्रामीण भागात अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील.’’  
हातकणंगले कॉंग्रेस तालुकाध्यक्ष भगवान जाधव, शिवसेना शहरप्रमुख संदीप पाटील, महावितरण अभियंता सचिन जगताप, तालुका युवाध्यक्ष कपिल पाटील, शिवाजी भोसले आदी उपस्थित होते. अंजुम मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले.