घोणस सापाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोणस सापाला जीवदान
घोणस सापाला जीवदान

घोणस सापाला जीवदान

sakal_logo
By

01990

घोणस सापाला जीवदान
पेठवडगाव, ता. ४ : येथील निसर्गप्रेमी मित्र ग्रुपच्या सर्पमित्र टीमने पाटील धाब्याचा पाठीमागे असणाऱ्या शेतातील विहिरीत चार दिवसांपासून पाण्यात पडलेल्या घोणस सापाला सुरक्षित काढून जीवदान दिले. त्याला पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडून दिले.
येथील पाटील धाबा यांच्या मागे असणाऱ्या विहिरीत दोन दिवस साप काढण्यासाठी सर्पमित्र प्रयत्न करत होते. पायऱ्या नसल्यामुळे सापाला काढण्यात अडचण येत होती. पण दोरी, कॅरेट तसेच सर्पमित्र तुषार दोरकर हे दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरले आणि स्टिकच्या सहाय्याने सापाला कॅरेटमधून विहिरीच्या बाहेर काढले. सर्पमित्र विजय मुंदाळे, डॉ. शुभम करडे, ओंकार पाटील, डॉ. अमोल पाटील, प्रकाश जगदाळे, जयराज तोडकर, डॉ. निलेश ढोबळे, डॉ. निलिमा पाटील यांनी परिश्रम घेतले.
--------------
साप हा निसर्गातील महत्वाचा घटक आहे. तो मानवी वस्तीत आल्यास त्याला पकडण्यासाठी वन खात्यातील कर्मचारी लगेच पोहोचू शकत नाहीत. परिणामी लोक मारण्याचा पर्याय काढतात अशा वेळी त्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्पमित्र जीव धोक्यात घालून अहोरात्र मेहनत करत असतात. त्यामुळे सर्पमित्रांना स्थानिक प्रशासन, वन खाते यांनी शासनस्तरीय अनुदान देण्याची तरतूद करणे आवश्यक आहे.
-डॉ. अमोल पाटील,
अध्यक्ष, निसर्गप्रेमी मित्र, पेठवडगाव